महाराष्ट्र
कोल्हापुरात भर पावसात मूक आंदोलन; संभाजीराजे, आंबेडकर, चंद्रकांत पाटलांची उपस्थिती
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलनाची हाक दिली होती. कोल्हापुरात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी हे आंदोलन होत आहे. पावसाच्या अचानक आगमनामुळे थोडासा गोंधळ उडाला आहे मात्र मूक आंदोलन सुरूच राहणार आहे.
दरम्यान, आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्यासह राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे.
कोरोना नियमांचं पालन करून मूक आंदोलन करा. सर्व नियमांचं पालन करून शांततेत आवाहन करणं गरजेचं आहे, असं आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे.