Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर; पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर; पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल

कोल्हापूर पाऊस सुरुच आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोल्हापूर पाऊस सुरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर झालेली पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. पंचगंगेची पाणीपातळी 41 फुटांवर पोहोचली आहे. तर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण हे 90 टक्के भरल आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुरामुळे 8 राज्य मार्ग आणि 20 प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरात मुसळधार पाऊस पडत आहे.

पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आवाहन केलं आहे. सर्वच नद्या या संत गतीने धोका पातळीकडे वाटचाल करत आहेत. आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा, असे आवाहन करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com