Kolhapur Rain Update : कोल्हापुरात धरण क्षेत्रात अतिवृष्टी सदृश पाऊस, 20 बंधारे अद्यापही पाण्याखाली
(Kolhapur Rain Update ) कोल्हापूर शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश्य मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून सध्या ती 26 फूट 11 इंचांवर पोहोचली आहे.
राजाराम बंधारा व परिसरातील 20 बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत. सततच्या पावसामुळे धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ पावले उचलली असून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुरू करण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांत विशेषतः धरण क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस कायम आहे. गेल्या काही वर्षांतील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी नदीकाठच्या ठिकाणी न जाण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.