Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षक बदली घोटाळा; 26 शिक्षकांची प्रमाणपत्र बोगस
थोडक्यात
- कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षक बदली घोटाळा 
- 26 शिक्षकांची प्रमाणपत्र बोगस 
- 4 जणांवर निलंबनाची कारवाई 
(Kolhapur) कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी बदलीसाठी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली असून 26 शिक्षकांची प्रमाणपत्रे ही बोगस आढळून आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी चार शिक्षकांना याआधीच निलंबित करण्यात आलं होते.
मात्र आता उरलेल्या शिक्षकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी आता शिक्षकांवर टांगती तलवार असून या शिक्षकांवर फौजदारी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
त्यामुळे आता बनावट दिव्यांग प्रमाणपत्र आणि आजार प्रमाणपत्र सादर करणाऱ्या 4 शिक्षकांवर जिल्हा परिषदेनं कडक कारवाई केली असून 27 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या सर्व प्रकारामुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

