कोळकेवाडी धरणाने अडवला पूर

कोळकेवाडी धरणाने अडवला पूर

Published by :
Published on

निसार शेख | चिपळूणला 22 जुलैला आलेल्या पुराबदल कोयना प्रकल्पाला दोष दिला जातो. वास्तविक कोळकेवाडी विद्युत गृहातून सोडलेले पाणी हे कोयना प्रकल्पाचे नसून स्थानिक नाल्यातून आलेला पुराचा लोढा आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

कोयना प्रकल्पाच्या 1 व 2 आणि 4 टप्प्याच्या वीज गृहातून सोडलेले पाणी कोळकेवाडी धरणातून तात्पुरते साठविण्यात येते कोळकेवाडी धरण बोलादवाडी नाल्यावर बांधले असून धरणाचे स्वतःचे पाणलोट क्षेत्र 25.40 चोरश किलोमीटर आहे. कोळकेवाडी धरणाची साठवण क्षमता ही केवळ 1.35 टी एम सी एवढीच आहे आणि ती कोयना प्रकल्पाच्या 1 व 2 आणि 4 टप्प्यातून विसर्जित होण्याच्या पाण्याचा प्रमाणातच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कमीत कमी क्षेत्र बुडले कोयना 1 व 2 आणि 4 टप्प्याचे वीज निर्मितीनंतर कोळकेवाडी धरणात येणारे पाणी वापरून कोळकेवाडी वीजगृहातून वीजनिर्मिती केली जाते 20 ते 23 जुले या तीन दिवसात कोयना टप्पा 1 ,2 आणि टप्पा 4 या मधून सरासरी 600 क्यूसेक ( घनफुट प्रति सेकंद ) इतकंच पाणी येत होते.

कोळकेवाडी धरणात पावसाळ्यात बोलादवाडी नाल्याच्या 25.40 चोरस किलोमीटर पाणलोटातील पानी येते याखेरीज वाशिष्ठी नदीवर पोफळी गावाजवळ एक बंधारा बांधला असून या बंधाऱ्यात येणारे पाणी एका बोगद्याद्वारे कोळकेवाडी धरणामध्ये सोडले जाते. याखेरीज पोफळीजवळ आणखी एक नाला स्वतंत्रपणे वाहत असून त्याचे पाणलोट शेतरदेखील खूप मोठे आहे. हा नाला देखील वळवून याचे पाणी कोळकेवाडी धरणात सोडले जाते कोळकेवाडी बनलोट क्षेत्रात 22 जुले 2021 च्या रात्री 355 मिली मीटर आणि जवळच पोफळी येथे याच दिवशी 555 मिमी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला हे सर्व पाणी एकाचवेळी कोळकेवाडी धरणांध्ये आले आणि कोळकेवाडी धरणातील पाण्याची पातळी अचानक वाढू लागली.

कोळकेवाडी धरणाला स्वतंत्र सांडवा असून त्याच्यावर तीन दरवाजे आहेत मात्र गेल्या 25 वर्षाला सांडवयाची दारे उघण्यात आली नाहीत कारण येणारे सर्वच पाणी हे विद्युतगृहातून सोडून वीज निर्मिती करणे सुरक्षित आणि किफायतशीर असते केवळ याच कारणामुळे गेल्या 25 ते 30 वर्षात कोळकेवाडी धरणाच्या सांडव्याचे वक्र दरवाजे उघडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बोलादवाडी नाला गेली कित्येक वर्ष पूर्णपणे कोरडा आहे याचा फायदा घेऊन हा नाला वाशिष्ठी नदीला मिळेपर्यंत या लांबीत अनेक वाडयावस्त्यांनी ( सुतारवाडी,भराडे, पेंढाबे, खड्पोली,कान्हे-पिंपळी ) पात्रात घरे बांधली आहेत त्यामुळे कोळकेवाडी धरणाच्या सांडव्याचे दरवाजे आता उघडले तर ही सर्व अतिक्रमित वस्ती वाहून जाण्याची शक्यता आहे. आणि त्यात खूप पशुधन आणि माणसे मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन कोळकेवाडीचे वक्र दरवाजे उघडले जात नाहीत.

त्यामुळे पावसाळ्यात कोळकेवाडी धरणात अतिरिक्त पाणी येऊ लागले तर केवळ विद्युतगृहातून ते पाणी सोडून विद्युत निर्मिती करणे आणि नियंत्रित स्वरूपात पाणी वाशिष्ठी नदीमध्ये सोडणे हा एकच पर्याय उरतो आणि तोच सर्वाना सुरक्षित असतो याच पर्यायांचा अवलंब करून 22 जुले रोजी कोळकेवाडी विजगृहातून केवळ 8400 क्यूसेक इतक्या मर्यादेने पाणी सोडून विद्युत निर्मिती करण्यात आली आणि पुराचा लोढा कोळकेवाडी धरणाच्या मागे तात्पुरता अडवून धरण्यात आला अन्यथा चिपळूणच्या पुरात आणखी भर पडली असती उलट कोळकेवाडी धरणाने चिपळूणचा पूर काही प्रमाणात का होईना कमी रोखण्यास मदतच केली आहे

पाऊस

  • 20 जुलै -कोयना 89,नवजा 152,महाबळेश्वर 113,पोफळी 120,कोळकेवाडी 135
  • 21 जुलै -कोयना 109,नवजा 148,महाबकेश्वर 140,पोफळी 321,कोळकेवाडी 102
  • 22 जुलै – कोयना 347,नवजा 427,महाबळेश्वर 424,पोफळी 555,कोळकेवाडी 355,
  • 23 जुलै – कोयना 610,नवजा 746,महाबकेश्वर 556,पोफळी 134,कोळकेवाडी 422,
  • 24 जुलै – कोयना 204,नवजा 207,महाबळेश्वर 287,पोफळी 65,कोळकेवाडी 87
  • 25 जुलै – कोयना 108,नवजा 110,महाबळेश्वर 173,पोफळी 70 ,कोळकेवाडी 62
  • 24 तासातील विसर्ग क्यूसेकमध्ये टप्पा 1 व 2
    20 जुलै -603
    21 जुलै -387
    22 जुलै -344
    23 जुलै -317
    24 जुलै-312
    25 जुलै -321 टप्पा 4

20 जुलै 56
21 जुलै -0
22 जुलै113
23 जुलै 0
24 जुलै 0
25 जुलै 0

कोयनेतुन कोळकेवाडीत विसर्ग

20 जुलै -659
21 जुलै -387
22 जुलै -457
23 जुलै -317
24 जुलै -312
25 जुलै -321

तिसरा टप्पा वाशिष्ठीत

20 जुलै -3075
21 जुलै -3047
22 जुलै 8623
23 जुलै 4410
24 जुलै1905
25 जुलै 2051

कृष्णा नदीत सोडलेले

20 जुलै -0
21 जुलै -0
22 जुलै -0
23 जुलै 2630
24 जुलै -48430
25 जुलै -33182*

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com