Ladki Bahin Yojana: फक्त २५ दिवस शिल्लक! बहिणींनो, ₹१५०० मिळवायचे असेल तर 'हे' काम लगेच करा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. डिसेंबर महिना सुरु झाला तरीही नोव्हेंबरचाच हप्ता जमा झालेला नाही, ज्यामुळे आता दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, यापुढचे हप्ते मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना केवायसी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य
लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. या तारखेपूर्वी केवायसी करणे आवश्यक आहे, अन्यथा जानेवारीपासून पैसे मिळणे थांबू शकते. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायचे आहे. या योजनेत केवायसी न केल्यास महिलांना आर्थिक मदत मिळणार नाही.
दरवर्षी केवायसी प्रक्रिया होईल, ज्यामुळे केवायसीद्वारे लाडकी बहीण योजनेबाबत पारदर्शकता वाढणार आहे. यामुळे फक्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्याची हमी राहील. केवायसी प्रक्रियेत महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती गोळा केली जाईल आणि २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. सध्या अनेक लाखो महिलांचे केवायसी अद्याप बाकी आहे. या महिलांनी शेवटच्या तारखेपूर्वी लवकर KYC करणे गरजेचे आहे.
नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार?
लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्त एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसेलही, दोन वेगवेगळे हप्ते येणार असल्याचे बोलले जात आहे. अशी चर्चा आहे की पहिला हप्ता निवडणुकीपूर्वी दिला जाईल. त्यामुळे लाभार्थींमध्ये उत्सुकता आणि चिंता दोन्ही पाहायला मिळत आहे.
लाडकी बहिण योजनेत महिलांना ₹१५०० लाभ मिळवण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे.
केवायसीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ असून ऑनलाइन पद्धतीने केली जाऊ शकते.
केवायसी प्रक्रियेत कुटुंबाचे उत्पन्न तपासले जाईल; २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले अर्ज रद्द होऊ शकतात.
नोव्हेंबर- डिसेंबर हप्ते एकत्र येतील की नाही याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.
