Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaLadki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिला मोठा संकेत, उडाली बहिणीची झोप

अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना काही महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आली होती.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना काही महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आली होती. दर महिन्याला दीड हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होणारी ही योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक ठरली आहे.

लाभार्थी महिलांसाठी वाढीची घोषणा—निर्णय अद्याप प्रलंबित

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील नेत्यांनी या योजनेतून मिळणाऱ्या रकमेचा लाभ वाढवून 2100 रुपये देण्याचा शब्द दिला होता. मात्र, प्रत्यक्षात या वाढीवर कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. तसेच, या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असल्याने सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण निर्माण झाल्याचीही माहिती पुढे आली आहे.

अयोग्य लाभार्थ्यांवर कारवाई सुरू

गेल्या काही आठवड्यांत अनेक महिलांनी पात्रता नसतानाही योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळल्यानंतर सरकार सतर्क झाले आहे. त्यानंतर सर्व लाभार्थ्यांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत केवायसी पूर्ण न करणाऱ्यांची नावे योजनामधून वगळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक महिला सध्या चिंतेत आहेत.

एक कोटी दहा लाख महिलांची केवायसी अद्याप बाकी

राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 1.10 कोटी महिलांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. मुदत फक्त एका दिवसावर आली असताना अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे . "केवायसी वेळेवर न झाल्यास पुढील हप्ता मिळणार नाही का?" याच पार्श्वभूमीवर मोठा दिलासा देणारी माहिती येत आहे. मिळालेल्या संकेतांनुसार सरकार केवायसीची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. अशी घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर मुदतवाढ झाल्यास लाखो लाडक्या बहिणींचं आर्थिक तणावातून सुटकेकडे पाऊल पडू शकते.

पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

सरकारने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मंगळवार हा केवायसीसाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अंतिम मुदत कायम ठेवली जाणार की, पुन्हा वाढवली जाणार? याकडे राज्यभरातील महिलांचे लक्ष लागून आहे. लवकरच होणाऱ्या अधिकृत घोषणेने योजनेतील लाभार्थ्यांच्या मनातील शंका आणि टेन्शन दूर होण्याची अपेक्षा आहे.

थोडक्यात

  • राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

  • अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना

  • दर महिन्याला दीड हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होणारी ही योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक ठरली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com