Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये हफ्ता, 'या'मंत्र्यानी दिली महत्त्वाची माहिती
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारकडून लाडकी बहिण योजनेंतर्गत १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता लवकरच सुरू करण्यासाठी हालचाली तीव्र झाल्या आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नांदेड येथील शिवसेना (शिंदे गट)च्या जाहीर सभेत हे मोठे विधान केले.
"लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यासाठी आमचा अभ्यास सुरू आहे. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उदय सामंत यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंबईतील शिवाजी पार्क येथे रविवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेत आदित्य ठाकरेंनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार, असा सवाल केला होता.

दरम्यान, डिसेंबर आणि जानेवारीच्या ३००० रुपयांचा हप्ता मकरसंक्रांतीला (१४ किंवा १५ जानेवारी) खात्यात जमा होईल, अशी माहिती आहे. भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले, "लाडकी बहिण योजना थांबणार नाही. महिलांना पैसे लवकर येतील." लाखो लाडक्या बहिणी या योजनेची वाट पाहत आहेत, जी राज्य सरकारची लोकप्रिय योजना ठरली आहे.
लाडकी बहिण योजनेत हप्त्यातील रक्कम १५०० ते २१०० रुपये वाढवण्याची तयारी.
उदय सामंत यांनी नांदेडमध्ये जाहीर सभेत मोठे विधान केले.
महापालिका निवडणुकीपूर्वी हप्त्याची अंमलबजावणी शक्य.
मकरसंक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारी हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार.