LADKI BAHIN YOJANA: DELAYED PAYMENTS LIKELY TO TOTAL ₹4500 IN JANUARY FOR BENEFICIARIES
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर; जानेवारीत ₹४५०० मिळण्याची शक्यता

Government Scheme: लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात आला नाही.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

डिसेंबर महिन्याचे शेवटचे दहा दिवस उरले तरी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबरचा हप्ता अद्याप मिळाला नाही. डिसेंबरचा हप्ताही कधी येईल याची वाट पाहत असताना आता हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची शक्यता बोलली जात आहे. राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी जानेवारीचा हप्ताही जोडला जाण्याची चर्चा सुरू झाली असून, तिन्ही हप्ते एकत्र आल्यास महिलांना ४५०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

LADKI BAHIN YOJANA: DELAYED PAYMENTS LIKELY TO TOTAL ₹4500 IN JANUARY FOR BENEFICIARIES
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेत E-KYC करताना चूक झाली? लगेच दुरुस्ती करा, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

निवडणुकीमुळे हप्त्यात विलंब

राज्यात उद्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असून, २१ डिसेंबरला निकाल जाहीर होईल. या कालावधीत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, त्यामुळे जानेवारी महिन्यात हप्ते जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाभार्थी महिलांना वाट लागली असताना हा विलंब होत असल्याने नाराजी व्याप्त झाली आहे. सरकार लवकरच याबाबत स्पष्टता करेल अशी अपेक्षा आहे.

LADKI BAHIN YOJANA: DELAYED PAYMENTS LIKELY TO TOTAL ₹4500 IN JANUARY FOR BENEFICIARIES
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिलासा! पुढील ७ दिवसांत ₹३००० थेट खात्यात, नोव्हेंबर–डिसेंबर हप्ता मिळण्याबाबत अपडेट

३१ डिसेंबरपर्यंत केवायसी अनिवार्य

योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे आवश्यक असून, ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. त्याआधी केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच पुढील हप्ता मिळेल, अन्यथा त्यांना योजनेतून वगळले जाईल. महिलांना मोबाइल किंवा स्मार्टफोनवरून ऑनलाइन पद्धतीने सहज केवायसी करता येईल. लाखो महिलांसाठी ही योजना महत्त्वाची असल्याने शासनाने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.

Summary
  • नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ते अद्याप महिला लाभार्थींच्या खात्यात आले नाहीत.

  • जानेवारीत दोन्ही हप्ते एकत्र येण्याची शक्यता; ₹४५०० मिळण्याची अपेक्षा.

  • राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमुळे विलंब झाला.

  • योजना लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करणे आवश्यक आहे; ऑनलाइन केवायसी करता येईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com