Ladki bahin Yojana:  2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? मोठी माहिती समोर

Ladki bahin Yojana: 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? मोठी माहिती समोर

लाडकी बहीण योजनेतील २१०० रुपयांचा हप्ता मार्चपासून मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Published by :
shweta walge
Published on

"माझी लाडकी बहिण" योजनेतील २१०० रुपयांची रक्कम कधीपासून सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याच दरम्यान, नव्या वर्षानिमित्त लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेतील २१०० रुपयांचा हप्ता मार्च महिन्यापासून महिलांना मिळण्याची शक्यता आहे.

पुढचा हफ्ता कधी?

आता जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रातीआधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2रुपये मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेत नव्याने 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मुख्यमंत्री "माझी लाडकी बहिण" योजनेला जुलै महिन्यापासून सुरुवात झाली आणि या योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. याअंतर्गत, महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जात आहेत. डिसेंबर महिन्यातही महिलांना १५०० रुपयांचा हप्ता मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने यामध्ये वाढ करून ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ही रक्कम वाढविण्यात आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com