Lalit Patil : सेटलमेंट करणारा ललित पाटील बनला ड्रग्ज माफिया

Lalit Patil : सेटलमेंट करणारा ललित पाटील बनला ड्रग्ज माफिया

पुण्याच्या ससून ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याची नवीन माहिती समोर येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्याच्या ससून ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याची नवीन माहिती समोर येत आहे. ललितची नाशिकमध्ये सोने घालून मिरविणारा 'नेता' म्हणून ओळख होती. मुंबईतील गुन्हेगारांना नाशिकमध्ये मदत करून सेटलमेंट करत असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच ललित मुंबईतील गुन्हेगारांना नाशिकमध्ये मदत करून सेटलमेंट करत पुढे एमडीचा ड्रग्ज माफिया बनला. गुन्हेगारांना कधी स्वतः जामीन राहत, तर कधी जामीन शोधून देण्यासाठी ललित मदत करत असल्याची माहिती मिळत आहे.

एमडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या मुंबईच्या फारुख बटाटाचा मुलगा सैफुल्लाला जामीनदार ललित राहिला होता. तसेच मुंबईतील संशयित नदीम सलिम सौरठीया व सैफुल्ला फारुख शेख या दोघांना नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. याच सैफुल्लाला ललित जामीन राहिला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com