जळगावच्या कन्नड घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

जळगावच्या कन्नड घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

Published by :
Published on

मंगेश जोशी | जळगाव जिल्ह्यात धुळे चाळीसगाव रोडवरील कन्नड कन्नड घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे कन्नड घाटाच्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान घटनास्थळी एसडीआरएफच्या 30 जणांची टीम दाखल झाली असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातला आहे. त्यामुळे दरड कोसळल्याच्या घटना घडत आहे. धुळे चाळीसगाव रोड वरील कन्नड कन्नड घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान घटनास्थळी एस डी आर एफ च्या 30 जणांची टीम दाखल झाली असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

औरंगाबाद – चाळीसगाव मार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळल्याने घाटरस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे जाण्यासाठी पर्यायी घारगाव रस्ता वापरावा, तर औरंगाबादहून येण्यासाठी अजिंठा-जळगाव महामार्ग वापरावा, असे चाळीसगाव येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक भागवत पाटील यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com