Mundhwa Land Scam : मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरण; व्यवहार रद्द झाल्याची केवळ अजित दादांकडून घोषणा , प्रत्यक्षात मात्र व्यवहार रद्द झाल्याचा करारनामा नाही?
थोडक्यात
मुंढवा येथील जमीन व्यवहार प्रकरण
व्यवहार रद्द झाल्याची केवळ अजित दादांकडून घोषणा
प्रत्यक्षात मात्र व्यवहार रद्द झाल्याचा करारनामा नाही , लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती
(Mundhwa Land Scam ) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात हा व्यवहार कधी रद्द होणार याची चर्चा सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
हा व्यवहार रद्द करण्यासाठी रद्द करारनामा करावा लागणार आहे. यासाठीही संपूर्ण ७ टक्के मुद्रांक शुल्क अर्थात २१ कोटी रुपये भरावे लागतील. त्यामुळे ४२ कोटी रुपये अधिक त्यावरील दंड सुमारे ३ लाख ६० हजार रुपये भरल्यानंतरच हा व्यवहार रद्द होईल.
खरेदी खतावेळी शीतल तेजवानी आणि अमेडिया इंटरप्राईजेस एलएलबीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील हे दोघे हजर होते. त्यामुळे व्यवहार रद्द करण्यासाठी या दोघांनाही हजर राहावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सध्या दोन गुन्हे दाखल झाल्याने शितल तेजवानी फरार आहे.
