लातूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला धक्का; सर्व उमेदवारांचे अर्ज बाद
लातूर जिल्ह्या बँक निवडणूकी मध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. सर्व जागा लढण्याची घोषणा करणाऱ्या भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज आता बाद ठरवण्यात आले आहेत.त्यामुळे लातूरमध्ये कॉंग्रसेला आयतेच बळ मिळाले आहे.
19 जागांसाठी लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत काँग्रेस, भाजप व अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे बाद झाले आहेत. अर्जांची छाननी करत असताना त्यात असलेल्या त्रृटींमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे सर्व अर्ज बाद केले.
या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर भाजपने आरोप केले आहेत यामध्ये जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमचे अर्ज बाद कऱण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करून लोकशाहीचा खून केला आहे. या प्रकरणी आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार करणार आहोत. तसेच सरकारी यंत्रणेच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणीही भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
अर्ज बाद करणाऱ्या सरकारी यंत्रणेने विरोधात राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती भाजपचे आमदार रमेश कराड यांनी दिलेली आहे.