लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राजकारणात; ‘या’ पक्षात करणार एन्ट्री

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राजकारणात; ‘या’ पक्षात करणार एन्ट्री

Published by :
Published on

प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे. 16 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या हाती घड्याळ बांधणार आहे.

गेल्या महिन्यातच सुरेखा पुणेकर यांनी पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. आता अखेर त्या राष्ट्रवादी काॅंग्रसेमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्या प्रवेशाच्या बातमीनं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, विधान परिषदेवर आमदार होण्याची इच्छा असताना सुरेखा पुणेकर यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या प्रवेशाच्या चर्चांना उधान आलं होतं. आता अखेर प्रवेश झाला आहे तर तमाशाचे फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर आता राजकारणाचे फड रंगवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com