Laxman Hake : ओबीसींच्या प्रश्नावर राज्यातील 50 तालुक्यात जाहीर सभा घेणार
आष्टी तालुक्यातील हातोला गावात आघाव कुटुंबांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास लक्ष्मण हाके यांनी भेट देत ओबीसीच्या प्रश्नावर ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी ओबीसीच्या प्रश्नावर राज्यातील 50 तालुक्यात सभा आणि बैठका घेतल्या जाणार आहेत. तर वेळेप्रसंगी सर्व ओबीसींची एकजूट करून ओबीसी समाज आझाद मैदानावर दाखल होणार असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.
यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, या महाराष्ट्रामध्ये अजून किमान आम्ही 50 तालुक्याच्या ठिकाणी आमच्या जाहीर सभा होतील आणि वेळ पडली तर ओबीसीच्या आरक्षणाच्यासंदर्भात आम्ही आझाद मैदानावरती या महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसींना हाक देणार आहोत.
तसेच ते पुढे म्हणाले की, जरांगेंना आमचं म्हणणं आहे 288 उमेदवार पाडणार कुणाला आहात? तुम्हाला सगळेच आमदार, सगळेच खासदार, सगळेच आजी माजी मुख्यमंत्री पाठिंबा देतील पण तुम्ही पराभव नक्की करणार आहे कुणाचा? ओबीसींचा पराभव करणार आहात? की ओबीसींचं आरक्षण संपवणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार आहात? असे लक्ष्मण हाके म्हणाले.