Ankush Kakade : 'चौथ्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर लाईट लागली नाही'; पुण्यात राष्ट्रवादीच्या अंकुश काकडेंचा आरोप
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ankush Kakade) मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे.
या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. उद्या 16 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता अनेक मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच आता पुण्यात राष्ट्रवादीचे अंकुश काकडेंनी आक्षेप नोंदवल्याचे पाहायला मिळत असून चौथ्या मतदानानंतर लाईट लागली नसल्याचा आरोप अंकुश काकडेंनी केला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये वेळ पुढे दाखवत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे.
Summary
पुण्यात राष्ट्रवादीचे अंकुश काकडेनी नोंदवला आक्षेप
चौथ्या मतदानानंतर लाईट लागली नाही
ईव्हीएम मशीनमध्ये वेळ पुढे दाखवत असल्याचा आरोप
