जळगावात शासकीय कार्यालयात रंगली दारू पार्टी; व्हिडीओ व्हायरल

जळगावात शासकीय कार्यालयात रंगली दारू पार्टी; व्हिडीओ व्हायरल

Published by :
Published on

मंगेश जोशी । जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शासकीय कार्यालयात दारू पार्टी रंगल्याची घटना घडली आहे. या घटने संबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे. दरम्यान शासकीय कार्यालयाचा दारू पार्टीसाठी वापर करणाऱ्या संबंधितांवर कारवाई होणार का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्याचे विभागीय कार्यालयाचे नुकतेच जळगावात उद्घाटन करण्यात आले होते. या प्राधिकरणाच्या कार्यालयात दारूची पार्टी रंगल्याची घटना घडलीय. या संबंधित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काही व्यक्ती दारू पिताना दिसत आहे. दरम्यान शासकीय कार्यालयात दारूची पार्टी करण्यास परवानगी कोणी दिली ? शासकीय कार्यालय दारू अड्डयासाठी उघडले असे सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. तसेच संबंधित व्यक्तींवर कारवाई होणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com