Pune : पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवारांची यादी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
Pune : पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवारांची यादी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेल्याची माहिती मिळत आहे. पुण्यात काही पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इच्छुकांना तिकीट दिल्याने ही यादी पुणे पोलिसांकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
यामध्ये 20 न्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची नावे आहेत. यासाठी पोलिसांकडून एक निरीक्षण समिती पण स्थापन करण्यात आली आहे. या सगळ्या उमेदवारांवर लक्ष ठेऊन असणार आहेत.
या यादीमध्ये प्रामुख्याने सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कुख्यात गुंड गजानन मारणे ची पत्नी जयश्री मारणे, गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर अश्या उमेदवारांची नावे यादी मध्ये समाविष्ट असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांची करडी नजर या सगळ्या उमेदवारांवर असणार आहे.
Summary
पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवारांची यादी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात
ही यादी पुणे पोलिसांकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आली
20 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची या यादीत नावे
