पंतप्रधान मोदींकडून एम्स रुग्णालयाचं लोकार्पण

पंतप्रधान मोदींकडून एम्स रुग्णालयाचं लोकार्पण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

पंतप्रधान मोदींकडून एम्स रुग्णालयाचं लोकार्पण

 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था राष्ट्राला समर्पित केले आहे. १४ एप्रिल २०१७ रोजी पंतप्रधानांनी या संस्थेचे भूमिपूजन केले होते. याच कार्यक्रमादरम्यान सिपेट-सेंटर फॅार स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (सीएसटीएस) चंद्रपूरचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृध्दी महामार्गाचे लोकार्पण 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यासाठी भाग्यरेखा ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ७२० किलोमीटरच्या अत्यंत महत्वाकांक्षी महामार्गाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले आहे. या रस्त्यावरून ते दहा किलोमीटर पंतप्रधान मोदी प्रवास करणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान फ्रीडम पार्क येथून मेट्रोने खापरीला रवाना झाले आहेत. या प्रवासादरम्यान विविध वर्गातील नागरिक, महिला व मुलांशी त्यांनी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींनी दाखवला वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी नागपूर ते बिलासपूर या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभही मोदींच्या हस्ते करण्यात आला आहे. आज वंदे भारतला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर वंदे भारत ट्रेनचे बुकींग सर्वसामन्यांसाठी खुले झाले आहे. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो प्रदर्शनचेही उद्घाटन करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये दाखल

समृद्धी महामार्गचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. यासाठी पंतप्रधान नागपूर विमानतळावर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत.

नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हा मार्ग १० जिल्ह्यांतील ३९२ गावांमधून धावेल आणि दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सात तासांपर्यंत कमी करेल. 11 तारखेनंतर सामान्य नागरिकांसाठी समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. महाराष्ट्रासाठी बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com