Local Body Elections
महाराष्ट्र
Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती नाही, निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार - सुप्रीम कोर्ट
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली .
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Local Body Elections ) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाची 50 टक्क्यांची घटनात्मक मर्यादा ओलांडल्याने हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं.
या सुनावणीत 'निवडणुकीला कोणतीही स्थगिती नसून निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार' असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. नगरपरिषद , नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचे देखील कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टात 21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
Summery
निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट
निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार
नगरपरिषद , नगरपालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार
