Om Birla : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज मुंबई दौऱ्यावर

Om Birla : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज मुंबई दौऱ्यावर

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ओम बिर्ला यांच्या हस्ते कुर्ला येथील शासकीय आयटीआयमध्ये 'हर घर दुर्गा' अभियानाचा शुभारंभ होणार आहे. शासकीय आयटीआयमध्ये मिळणार स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 'केरळा स्टोरीज' चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. कुर्ला येथील शासकीय आयटीआयमध्ये अभियानाचा आज शुभारंभ होणार आहे.

राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण घ्यावे असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तरुणी आणि महिलांना आवाहन केलं आहे. तसेच या अभियानामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

यासोबतच शासकीय आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनींसोबत इतर महिला देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात. नवरात्र उत्सव मंडळांनाही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उत्सवाचा एक भाग म्हणून स्वसंरक्षण शिबिराचा एक कार्यक्रम ठेवण्याचे आवाहन केले आहे. शासकीय आयटीआयमध्ये संपूर्ण वर्षभर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तासिका स्वरूपात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com