Lokशाहीचा दणका; 25 लाखांचं खड्डे बुजवण्याचं काम थांबवलं
भूपेश बारंगे | वर्ध्यात रस्त्याच्या नूतनीकरणासाठी 5 कोटी मंजूर असताना देखील जिल्हा परिषदेकडून 25 लाखाचा निधी मंजूर करत काम सूरू करण्यात आले होते. या संबंधित घटनेचे वृत्त Lokशाही ने "मलमपट्टीच्या नावावर 25 लाखाची उधळपट्टी" या मथळ्याखाली प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर जिल्हा परिषद खडबडून जागे झाले असून 25 लाखांच्या रस्ते नूतनीकरणाचं काम थांबवण्यात आले आहे. Lokशाही न्यूजच्या बातमीमुळे हे शक्य झाल्याने नागरीकांनी लोकशाही न्यूजचे आभार मानले आहेत.
वर्ध्यातील कारंजा येणगाव नूतनीकरण रस्त्याकरिता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 5 कोटी मंजूर असून कामाचे वर्क ऑर्डर देण्यात आले आहे.तरीही जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून 25 लाखाचा निधी खड्डे बुजवण्याकरीता मंजूर केले मात्र वर्क ऑर्डर आदेश न देता कामाला सुरुवात केली होती.या कामात गौडबंगाल असल्याचे Lokशाही ने "मलमपट्टीच्या नावावर 25 लाखाची उधळपट्टी" या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्याने खड्डे बुजवण्याचे काम काही तासातच जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून थांबवण्यात आले. Lokशाही न्यूज च्या वृत्ताने जिल्ह्यासह बांधकाम विभागात खळबळ उडाली. 25 लाखाचा घबाड Lokशाहीच्या वृत्ताने थांबविल्याने अनेकांनी Lokशाही आभार मानले. याच रस्त्यावर 5 कोटी निधी मंजूर असताना त्या विभागाकडून रस्त्याचे तातडीने कामे सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
रस्त्यावर टाकलेल्या साहित्याचे पैसे द्या
कारंजा – येणगाव रस्त्यावर खड्डे बुजवण्यासाठी टाकण्यात आले गोटा व मुरूम पैसेच्या मागणी करण्यात आला यासाठी एका पदाधिकारी यांच्या कारभारी पतीदेवाने डिके कन्ट्रक्शन कंपनीने साहित्याचे पैसे द्यावे अशी विनवणी केली.
खड्डे बुजवण्याचे काम थांबवले
कारंजा – येणगाव रस्त्यांवर खड्डे बुजवण्याचं वर्क ऑर्डर काढले नव्हते ते काम तात्काळ बंद करण्यात आले असून तो निधी इतरत्र कामासाठी वापरल्या जाईल असे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंधे यांनी सांगितले.
'त्या' कामाची चौकशी
कारंजा येणगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचे चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्याधिकारी यांना करायला सांगितले असे जिल्हा परिषद वर्धाचे मुख्याधिकारी सचिन ओंबासे यांनी सांगितले.