LOKशाहीविरोधात दडपशाही! चॅनेल बंद करण्याचे आदेश

लोकशाही मराठीची बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत.

लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

लोकशाही मराठीने एक भूमिका मांडली. स्पष्टपणे, निर्भिडपणे पत्रकारीता करण्याचे काम लोकशाहीने केली आहे. या 26 जानेवारी रोजी लोकशाही मराठी चौथा वर्धापन दिन साजरा करणार होतो. पण, गेले काही दिवस वारंवार माहिती आणि प्रसारण मंत्रालय खात्याकडून नोटीस देण्यात येत होत्या. 17 जुलै 2023 रोजी एक बातमी दाखवली होती. आम्हाला 72 तास चॅनेल बंद करण्याची नोटीस आली होती. यानंतर दिल्ली हायकोर्टात याविरोधात आम्ही अपील केले होते. यानंतर आमच्यावरील बंदी काढून घेतली होती. पण, आता पुन्हा एकदा लोकशाही मराठीचं लायन्सस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चार महिन्यांपूर्वी प्रसारण खात्याने आमच्याकडून माहिती मागवली नव्हती ती अचानकपणे वेगवेगळी माहिती मागविण्यात आली. यामध्ये लायन्ससबाबत प्रश्न उपस्थित करत लोकशाही मराठी बंद करण्याचे काही मिनिटांपूर्वी आदेश दिले आहेत. न्यायालयीन लढाई आम्ही लढूच. महाराष्ट्रच्या इतिहासात पहिल्यांदाच चॅनेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com