Nandurabar police
Nandurabar police

लोकशाहीच्या बातमीनंतर 'त्या' प्रकरणात अज्ञात आरोपीवर गुन्हा

Published by :
Published on

नंदुरबार जिल्ह्यात डाकीण असल्याच्या संशयावरुन महिलेला विवस्त्र करुन मारहाण झाल्याची घटना घडली होती. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या महिलेवरील अत्याचाऱ्याच्या (Wome viral Video) या व्हिडीओमुळे चांगलीच खळबळ उ़डाली होती. या प्रकरणावर लोकशाही न्यूजने (Lokshahi Impact) वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात महिलेला विवस्त्र करुन तिला डाकीन ठरवत छळ केल्याच्या व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. आजही डाकीन सारख्या अंधश्रद्धेवर आधारीत कुप्रथेमुळे महिलांची कशी अमानुष पद्धतीने छळ केला जातो, याला वाचा फोडणारा हा व्हिडीओ सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला होता. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या महिलेवरील अत्याचाऱ्याच्या या व्हिडीओमुळे चांगलीच खळबळ उ़डालीय. लोकशाही न्यूजने (Lokshahi Impact) डाकीण असल्याच्या संशयातून महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर नंदुरबार पोलीसांनी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. या घटनेबाबत रविवारी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पोलीस अधिक्षकांना निवेदन दिलं होतं. या सबंधित घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीसांनी या प्रकरणी अज्ञाता विरोधीत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com