महाराष्ट्रातील भाजपाचे 47 आमदार आजपासून मध्य प्रदेश दौऱ्यावर

महाराष्ट्रातील भाजपाचे 47 आमदार आजपासून मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत.

मुंबई: महाराष्ट्रातील भाजपाचे 47 आमदार आजपासून मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसल्याचं पहायला मिळत आहे. भाजपच्या आमदारांकडे तेलंगणा आणि मध्यप्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. मध्यप्रदेशपासून या दौऱ्याला सुरूवात झाली असून आठवडाभर मध्य प्रदेशमध्ये राहिल्यानंतर हे आमदार तेलंगणात जाणार आहेत. सलग 7 दिवस सकाळी 7 ते रात्री 7 प्रत्येक आमदारावर अ‍ॅपच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com