राजकारण
नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये झाली बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर सुरू बैठक झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर सुरू बैठक झाली. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल, सुनील तटकरे बैठकीला उपस्थित होते. जवळपास 4 तास 30 मिनिटे ही बैठक चालली.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विदर्भ आणि महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या संदर्भाने चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यात ज्याप्रमाणे वातावरण सुरू आहे आणि विरोधी पक्षाकडून होत असलेल्या टिकेला उत्तर देण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुती तील घटक पक्षांना किती जागा सोडता येऊ शकते , कोणत्या जागा दिल्या जाऊ शकतात या संदर्भात सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीची ही महत्त्वाची बैठक समजली जात आहे.