राजकारण
Ravi Rana : जिल्ह्यातील कोणताही नेता रवी राणाचा दुश्मन नाही
अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं.
अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. रवी राणा म्हणाले की, रवी राणा हा कुठल्या नेत्याच्याविरोधात नाही आहे. या जिल्ह्यातला कुठला नेता रवी राणाचा दुश्मन नाही आहे.
ते अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार असू द्या. ते मेळघाटचे माजी आमदार असूद्या किंवा तिवसा मतदारसंघाचे माजी आमदार असूद्या. कुठलेही माजी आमदार असूद्या त्यांनी मला चहा प्यायला बोलवा मी त्यांच्या घरी जायला तयार आहे. असे रवी राणा म्हणाले.