Aaditya Thackeray
Aaditya ThackerayTeam Lokshahi

सरकारची पोटनिवडणुका घेण्याची हिंमत होत नाही : आदित्य ठाकरे

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा तारखा आज समोर आल्या आहेत. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत तारखा जाहीर केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहेत.

Aaditya Thackeray
Election Commission : निवडणुकांचे बिगुल वाजले; पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

तारखा जाहीर झाल्या असल्या तरी पुणे, चंद्रपूर लोकसभेच्या पोटनिवडणुका जाहीर होत नाहीत. महापालिकेच्या, जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही घेतल्या जात नाहीत, असे का होत आहे हे माहित नाही. सरकारची निवडणुका घेण्याची हिंमत होत नसावी, अशी जहरी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

नांदेड, संभाजीनगर आणि नागपुरातील रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. या संदर्भात चर्चा होणे आणि ते कसे थांबवता येतील, यावर विचार होणे आवश्यक असून आज त्यासाठीच मी नागपुरात आलो आहे, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com