Aaditya Thackeray : सिनेट निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आदित्य ठाकरेंची आज पत्रकार परिषद
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी 24 सप्टेंबरला मतदान पार पडलं. काल 27 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या मुंबई सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय झाला आहे. विजयानंतर मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला.
10 जागांपैकी 9 जागांवर युवासेनाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडली असून या निवडणुकीसाठी 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवार उभे होते.
राखीव गटाच्या पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार मात्र याला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक घेण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. सिनेट निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.