Mumbai BJP
Mumbai BJP

Mumbai BJP : बिहारनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी भाजप सज्ज; महिला व युवा मतांसाठी विशेष रणनीती आखली जाणार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai BJP) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. बिहारनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी भाजप सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून बिहारमध्ये युवा व महिलांची मते निर्णायक ठरलीत.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत देखील महिला व युवा मतांसाठी विशेष रणनिती आखली जाणार आहे. भाजप युवा मोर्चा व महिला मोर्चावर विशेष जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये विविध कार्यक्रम घेतले जाणार असून महिला आणि युवकांचे प्रश्न भाजपकडून प्राधान्याने सोडवले जाणार तसेच महिला व तरुण मतदारांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • बिहारनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी भाजप सज्ज

  • बिहारमध्ये युवा व महिलांची मते ठरली निर्णायक

  • मुंबईत महिला व युवा मतांसाठी विशेष रणनिती आखली जाणार

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com