NCPTeam Lokshahi
राजकारण
जयंत पाटलांना भेटू न दिल्यानं, कार्यकर्त्यांमध्ये जुंपली
जयंत पाटील जालना दौऱ्यावर असताना झाला हा वाद
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज जालन्या दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यात त्यांनी जालन्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. ही बैठक संपल्यानंतर जयंत पाटील यांना कार्यकर्त्यांना भेटू न दिलं गेल्यानं आपआपसात जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे.
जयंत पाटील हे संभाजीनगर येथील पदाधिकाऱ्यांशी एका खोलीत बोलत असताना राष्ट्रवादीच्या जाफ्राबाद,बदनापूर आणि भोकरदन येथील कार्यकर्त्यांना त्यांना भेटू देण्यात आलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये चां गलाच वाद झाला.त्यामुळे संतापलेल्या भोकरदन आणि जाफ्राबाद मधील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जयंत पाटील यांचा निषेध नोंदवला.