Dhananjay Munde : उत्तर द्यायला तयार, पण...; विधान परिषदेत कृषीमंत्री धनंजय मुंडे विरोधकांवर संतापले

Dhananjay Munde : उत्तर द्यायला तयार, पण...; विधान परिषदेत कृषीमंत्री धनंजय मुंडे विरोधकांवर संतापले

पावसाळी अधिवेशन सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. यावेळी विधान परिषदेत बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे विरोधकांवर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. धनंजय मुंडे म्हणाले की, मी अनेक वर्षे या सभागृहाचा सदस्य राहिलो. पण हे चित्र मी कधीच पाहिले नाही. मी देखील विरोधी पक्ष म्हणून या सदनात काम केलय.

टीका करायला विरोधक उपस्थित राहतात, पण सरकार उत्तर द्यायला उपस्थितीत राहिलं की विरोधी बाकावर एक सदस्य सोडून कोणीही उपस्थितीत नसतं. प्रश्नांवर सरकारचे उत्तर ऐकायला या सदनात विरोधी पक्ष नाही. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला सरकार उभं आहे. मात्र ऐकायला एकही विरोधक नाही. असे धनंजय मुंडे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com