NCP - Thackeray Shivsena
NCP - Thackeray Shivsena

NCP - Thackeray Shivsena : अजितदादांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार; स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतला निर्णय

स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतला निर्णय
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • रायगडच्या कर्जतमध्ये महायुतीत दरार

  • अजितदादांची राष्ट्रवादी आणि उबाठा एकत्र येणार

  • स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतला निर्णय

(NCP - Thackeray Shivsena) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जसजशा जवळ येत आहेत तसतसे राजकीय समीकरणांची उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे.

रायगड जिह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षात एक बैठक होऊन या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोघांनी मिळून एकत्र लढण्याचा निर्धार केला असल्याची माहिती मिळत आहे.

या निर्णयाने आता महायुतीतील घटक पक्षात नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, भरत भगत , अशोक भोपतराव , तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपजिल्हाप्रमुख नितीन सवंत, भिवसेन बडेकर, प्रदिप ठाकरे उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com