राजकारण
अजित पवार यांची आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त; एकनाथ खडसे म्हणाले...
अजित पवार यांची आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे.
अजित पवार यांची आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली संपत्ती जप्त केली होती.
ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, जो जो भारतीय जनता पार्टीसोबत जाईल. त्याला आतापर्यंत क्लिनचीट मिळत आलेली आहे. अजितदादांना मिळेल हे अपेक्षित होते.