बारामती विधानसभा निवडणुकीसंदर्भातील अजित पवार यांच्या 'त्या' विधानावर रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या...
बारामती विधानसभा निवडणुकीसंदर्भात अजितदादांनी मोठं विधान केलं आहे. जय पवार यांना उमेदवारी देण्याच्या मागणीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, शेवटी काय लोकशाही आहे. मला फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे कारण मी साठ- आठ निवडणुका केलेल्या आहेत. त्याच्यासंदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरुर तो ही विचार केला जाईल. पार्लमेंटरी बोर्ड आणि त्याभागातील कार्यकर्ते जी काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार आहोत. असे अजित पवार म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर आता रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, माननीय अजितदादा हे तरुणांना संधी देत आहेत ही वृत्ती त्यांची दिसून आली. परंतु अजितदादा जे म्हणाले मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही तर आम्ही तसं होऊ देणार नाही. आम्हाला अजित दादा हे मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहेत.
त्याच्यामुळे हा दादांचा मोठेपणा आहे की, मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही परंतु जर बारामतीतून सांगितले तर मी जय पवार यांना निवडणूक लढायला संधी देईन हे बोलले जरी असले तर यातून दोन गोष्टी तुमच्या लक्षात येतील. अजितदादा हे आमचं भावी मुख्यमंत्री आहेत आणि तरुणांना संधी देण्याची वृत्ती दादांकडे आहे ते इतरांसारखे नाही आहेत. मीच, माझ्याशिवाय कोणी नाही ही दादांची वृत्ती नाही आहे. असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.