राजकारण
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला Ajit Pawar गैरहजर राहणार
आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे.
आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला अजित पवार जाणार नाही आहेत. अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या बैठकीला दुसऱ्यांदा जाणं टाळलं आहे.
अजित पवार दौंडला जात आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळाची आज बैठक पार पडते आहे. या बैठकीला शरद पवारही उपस्थित असणार आहेत. तर अजित पवारही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, खासगी कामानिमित्त अजित पवार दौंडला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अजित पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला जाणं टाळल्याची चर्चा सुरू झालीये.