अमित शहा सहकुटुंब लालबाग राजाच्या चरणी लीन

अमित शहा सहकुटुंब लालबाग राजाच्या चरणी लीन

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त
Published on

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर असून लालबागचा राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार उपस्थित होते. यादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अमित शहा यांचे रविवारी रात्री मुंबईत आगमन झाले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे एयरपोर्टवर स्वागत केले होते. नियोजित दौऱ्याआधी चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर ते अमित शाह यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन दौऱ्यास सुरुवात केली. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शन घेतील. व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. यादरम्यान अमित शाह यांच्या हस्ते ए. एम. नाईक यांनी उभारलेल्या शाळेचे उद्‌घाटन होणार आहे. यानंतर ते दिल्लीकडे रवाना होतील.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्तझाले आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठीचा अमित शहा कानमंत्र देण्याची शक्यता आहे. तर, मागील काही दिवसांपासून भाजपची मनसेशी जवळीक वाढत आहे. अनेक वेळा फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात भेटीगाठी झाल्या. याच, पार्श्वभूमीव अमित शहा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेण्याच्या चर्चा सुरु आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com