अनिल बोंडे यांचं राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य; यशोमती ठाकूर म्हणाल्या...

अनिल बोंडे यांचं राहुल गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य; यशोमती ठाकूर म्हणाल्या...

भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे. असे डॉ. अनिल बोंडे म्हणाले. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर म्हणाले की, डॉ. अनिल बोंडेचं संतुलन बिघडलं आहे. त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती झालं पाहिजे. एखादा अडाणी माणून बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे. हा तर डॉक्टर आहे. बेअक्कल, मूर्ख माणूस आहे.

याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे. म्हणून ही अशी वक्तव्य करतो आहे. तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी. तुम्ही ही फेक नेरेटिव्हचं बादशाह आहात आणि तुमचे हे जे चमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा. तुम्ही प्रवृत्त करता.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचे काम हे लोक करत आहेत. यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com