Anil Deshmukh Team Lokshahi
राजकारण
तब्बल वर्षभरानंतर अनिल देशमुखांची कारागृहातून सुटका, कार्यकत्यांकडून जोरदार जल्लोष
माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी जेलमधून बाहेर.
100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज तुरुंगातून बाहेर आले. राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला होता. त्यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी कोर्टानं फेटाळली होती. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी जेलमधून बाहेर आले आहेत.
अनिल देशमुख कारागृहातून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी कारागृहाबाहेर त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी हजारो कार्यकर्ते आधीपासून कारागृहाबाहेर देशमुख यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. अनिल देशमुख बाहेर येताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.