दंडुका डोक्यात बसणार नाही तोपर्यंत अध्यक्षांना काही कळणार नाही; अनिल परबांचा घणाघात

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन अनिल परबांनी नार्वेकरांवर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आता आम्ही अंतिम संधी देत आहोत. ३० ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर करावं, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना सुनावले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com