Anna Hazare : 'स्वार्थ आला आणि डाऊन झाला, अरविंद केजरीवालचं पाऊल चुकलं'
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्ली विधानसभेसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दिल्लीतल्या 70 विधानसभा क्षेत्रांमध्ये 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून आज 8 फेब्रुवारीला मतमोजणी होत आहे.
भाजप आघाडीवर दिसत असून भाजपाने दिल्लीत जोरदार मुसंडी मारली आहे. कलांनुसार भाजपला बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. दिल्लीत काँग्रेस पुन्हा एकदा पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. आपचे अनेक दिग्गज पिछाडीवर दिसत आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे म्हणाले की, लोकशाहीमध्ये नागरिकांनी दिलेला कौल तुम्हाला मान्य करावा लागेल. मी केजरीवालला यासाठी बरोबर घेतलं होते की, पैसे आणि पार्टी नाही. पक्ष आणि पार्टी विरहित समाजाची सेवा करायची, देशाची सेवा करायची. पण त्याने नंतर पक्ष आणि पार्टी काढली आणि तो डाऊन झाला.
शेवटी पक्ष आणि पार्टी म्हटल्यानंतर हवसे, गवसे आणि नवसे सर्व येतात. मी आंदोलनं केली, आंदोलनामध्ये माझ्यावर बोटं उठवली पण कोणाचे काही चाललं नाही. आचारशुद्ध आहेत विचारशुद्ध आहेत, जीवनात न्याग आहे. अपमान पचवण्याची शक्ती आहे. कोणाचे काही चाललं नाही. हे याचं पाऊल चुकलं. आरोप - प्रत्यारोप होत असतात. आरोप बरोबर आहेत की चुकीचं हे स्पष्ट व्हायला पाहिजे. यासोबतच ते पुढे म्हणाले की, स्वार्थ आला की डाऊन झाला. पक्ष आणि पार्ट्या सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी नाही आहे. देशाची सेवा. पक्ष आणि पार्ट्यांमध्ये जे पाऊलं चुकलं त्यांना जनतेनं नाकारलं. असे अण्णा हजारे म्हणाले.