Congress
Congress Team Lokshahi

काँग्रेसकडून नव्या वर्किंग कमिटीची घोषणा; महाराष्ट्रातील 'या' दिग्गज नेत्यांना संधी

काँग्रेसने जाहीर केलेल्या या नव्या काँग्रेस वर्किंग कमिटीत काँग्रेस अध्यक्षांसह एकूण 39 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 8 नेत्यांना स्थान मिळाले आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. त्यातच विविध पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू असताना आता नुकताच काँग्रेसने नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या या नव्या काँग्रेस वर्किंग कमिटीत काँग्रेस अध्यक्षांसह एकूण 39 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यकारणीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देखील असणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांना सुध्दा यामध्ये स्थान देण्यात आले आहे.

Congress
Russia’s Luna-25 Crashed:मोठी बातमी; लुना-२५ चंद्रावर कोसळले, चंद्रमोहिमीत रशिया ठरला अपयशी

काँग्रेसच्या नव्या कार्यकारणीत या नेत्यांचा समावेश?

1. अशोकराव चव्हाण

2. मुकुल वासनिक

3. माणिकराव ठाकरे (प्रभारी)

4. रजनीताई पाटील (प्रभारी)

5. अविनाश पांडे (महासचिव म्हणून)

कायम निमंत्रितांमध्ये चंद्रकांत हंडोरे हे असणार आहेत. तर विशेष आमंत्रितांमध्ये प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकूर या राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com