आम्हालाही रस्त्यावर उतरता येतं, मग खरी शिवसेना कळेल; अरविंद सावंतांचा इशारा

आम्हालाही रस्त्यावर उतरता येतं, मग खरी शिवसेना कळेल; अरविंद सावंतांचा इशारा

शिवसेना-शिंदे गटाच्या राड्यावर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया
Published on

मुंबई : शिवसेना-शिंदे गटामध्ये झालेला वाद आता विकोपाला जाताना दिसत आहे. पोलिसांनी पाच शिवसैनिकांना अटक केल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर जोरदार गोमधळ घालण्यास सुरुवात केली आहे. अशात आम्हालाही रस्त्यावर उतरता येतं. यामुळेच ज्यांना खरी शिवसेना पाहायची त्यांना खरी शिवसेना कळेल, असा इशारा शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, महेश सावंत तक्रार द्यायला आले होते. आज आम्ही सर्व आलो आहोत. चक्क सदा सरवणकर यांनी फायरिंग केली तिथेही आणि पोलीस स्टेशन बाहेरही. या दरम्यान गोळीबारात एका पोलिसाचा जीव वाचला आहे. तरीही शस्त्र वापरून गोळीबार कारवाई होत नाही. आता जोपर्यंत आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल होत नाही. तोवर आम्ही हलणार नाही. आम्हालाही रस्त्यावर उतरता येतं. यामुळेच ज्यांना खरी शिवसेना पाहायची त्यांना खरी शिवसेना कळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पोलिसांनी तक्रार घेतली असून त्यांना कधी अटक होते हे पाहायचे आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

तर, राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत. मुख्यमंत्र्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे. या सर्वांची जबाबदारी घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. कलम 395 खाली दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा म्हणूनच आम्ही वाट पाहतोय आमच्या लोकांना कधी सोडतात, असेही त्यांनी म्हंटले आहे. आणि राज्यकर्त्यांना कायदा-सुव्यवस्था बिघडवायचीच असेल तर आम्हालाही त्यापध्दतीने वागता येते, असाही इशारा त्यांनी शिंदे सराकारवर दिला आहे.

चोराच्या उलट्या बोंबा सुरु आहेत. सरकार बेकायदेशीर असंवैधानिक आहे. राज्यात सरकार गुंडांचं की कोणाचं हे समजत नाही. पूर्वी ठाकरे सरकारने गुंडांचा बंदोबस्त केला. परंतु, आता राज्यकर्तेच असे वागत आहेत. ही गुंडागर्दी चालू राहिली. तर मग राज्य कस चालणार, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

उध्दव ठाकरेंचे कौतुक करावे वाटते. इतका घाणेरडा प्रकार सुरु असतानाही राज्यात शांतता राहिली ती केवळ ठाकरेंनी संयमाची भूमिका घेतली म्हणूनच. तरी कोणीतरी डिवचतं राहील आणि आम्ही सहन करत राहू, अशा स्वप्नामध्ये राहू नये, असा निशाणाही त्यांनी शिंदे सरकारवर साधला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com