Ashish Shelar : आज देशाने काँग्रेसच्या युवराजांना पण दाखवून दिलेय,"पनौती कोण आणि चुनौती कोण"

Ashish Shelar : आज देशाने काँग्रेसच्या युवराजांना पण दाखवून दिलेय,"पनौती कोण आणि चुनौती कोण"

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
Published on

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ट्विट केलं आहे. आशिष शेलार यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या गल्लीत उभं राहून रोज एक नेता सांगत असतो, "होय मी मर्द आहे..!" त्यांचे बिनकामाचे सरदार पत्रकार पोपटलाल म्हणतात, "देशाला पुरुष हवाय!" अरे तुम्हाला मिडियाचे चार कॅमेरे सोडलं तर या देशात विचारतयं कोण?

आज कळलं का? मर्द कोण आणि मर्दानकी काय असते ती!आज देशाने काँग्रेसच्या युवराजांना पण दाखवून दिलेय. "पनौती कोण आणि चुनौती कोण!" महाराष्ट्रातील पंचायत ते राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या विधानसभा आणि लवकरच होणाऱ्या पार्लमेंटमध्ये फक्त मोदी मोदी आणि मोदी! असे आशिष शेलार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com