Bachchu Kadu On Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बच्चू कडू संतापले

Bachchu Kadu On Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बच्चू कडू संतापले

आपल्या वादग्रस्त विधानाने कायम चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आता पुन्हा एकदा वक्तव्याने प्रकाश झोतात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आपल्या वादग्रस्त विधानाने कायम चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आता पुन्हा एकदा वक्तव्याने प्रकाश झोतात आले आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केलीय. त्यामुळे राज्यात प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे. यावर विविध राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया येत असताना आता यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका माध्यमाशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, राहुल गांधींनी मध्यंतरी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत विधानं केली. आता यांनी महात्मा गांधींबाबत विधानं केली. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन ही विधानं केली जात आहेत.आपली औकात तपासली पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये तुमचं योगदान काय आहे? भिडेजी त्यांच्या वयानुसार स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले असतील. या देशात फक्त महात्मा गांधीच नाही, वीर सावरकरांबद्दलही बोललं जातं. असे बच्चू कडू म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं करत त्यांना अटकेची मागणी केली आहे. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com