Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana
Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana

Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana : माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ब वर्ग गटातून अजित पवार विजयी

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून 2025 रोजी मतदान पार पडले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana ) माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून 2025 रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र शरद पवार यांनी मतदान केलं नाही.

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. मतमोजणीला सकाळी नऊ वाजल्यापासून सुरूवात झाली असून या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana
Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana : माळेगाव सहकारी साखर कारखाना रणधुमाळी; आज मतमोजणी, मतदारांची पसंती कोणाला?

या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सुमारे 88.48 टक्के मतदान झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता ब वर्गातील मतमोजणी अखेर संपली असून ब वर्गातून अजित पवारांना तब्बल 91 मते मिळाली आहेत. तर सहकार बचाव पॅनलचे भालचंद्र देवकाते यांना केवळ 10 मते मिळाली असून ब वर्गातून अजित पवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे आज (24 जून) रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com