Bhai Jagtap on BMC Election : 'मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार'; भाई जगताप यांचा मुंबईत स्वबळाचा नारा
थोडक्यात
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांआधी सर्वात मोठी बातमी
'मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार'
भाई जगताप यांचा मुंबईत स्वबळाचा नारा
(Bhai Jagtap on BMC Election ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांआधी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
भाई जगताप यांनी मुंबईत स्वबळाचा नारा दिला असून याची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलेल्या वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भाई जगताप म्हणाले की, "राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना 'डंके की चोट' ही गोष्ट सांगितली होती. आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्येही आम्ही ही गोष्ट रमेश चेन्निथला यांना सांगितली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नेत्यांच्या नाही." असे भाई जगताप म्हणाले.
