Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav

Bhaskar Jadhav : 'वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या...'; भास्कर जाधव यांच्या 'त्या' स्टेट्सची चर्चा

आमदार भास्कर जाधव हे काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Bhaskar Jadhav) आमदार भास्कर जाधव हे काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांवर भास्कर जाधव यांनी आपण पक्षात नाराज नसल्याचे सांगितले, मात्र आता भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअपला ठेवलेल्या स्टेट्समुळे आता पुन्हा एकदा भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअप स्टेटसमध्ये म्हटले आहे की, दिवा जळतानाच त्याला तुपाची गरज असते, तो विझल्यानंतर तूप ओतण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं योग्य नाही.

त्यांच्या या स्टेटसमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता भास्कर जाधव यांना या स्टेटसमधून नेमकं काय सांगायचं आहे आणि त्यांचा नेमका रोख कोणाकडे आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com