राज ठाकरेंना मोठा दिलासा; शिराळा आंदोलन खटल्यातून राज ठाकरे यांची दोषी मुक्तता
राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 16 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली आहे. या सांगलीच्या शिराळा इथल्या खटल्यातून त्यांना दोषी मुक्त करण्यात आले आहे. इस्लामपूर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 2008 मध्ये शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी या ठिकाणी रेल्वे भरती प्रकरणी मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलन दरम्यान हिंसक प्रकार घडला होता. याप्रकरणी कोकरूड पोलीस ठाण्यामध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह राज ठाकरेंच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला होता.
या खटल्या निमित्ताने सुनावणीसाठी राज ठाकरे शिराळ्यामध्ये देखील हजर झाले होते, त्यानंतर सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहत असल्याने शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंना दोन वेळा अजामीनपात्र वॉरंट बजावला होता, दरम्यान राज ठाकरे यांचं नाव काढून टाकण्यात यावं, असा अर्ज इस्लामपूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये राज ठाकरेंकडून करण्यात आला होता. अखेर इस्लामपूर सत्र न्यायालयाने शेंडगेवाडी खटल्यातून राज ठाकरे यांना दोष मुक्त करण्यात येत असल्याचा निकाल दिला आहे. या निकालानंतर इस्लामपूरमध्ये मनसेच्यावतीने जिलेबी वाटून आनंद साजरा करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात रेल्वेत भरती होत असताना परप्रांतीय उमेदवारांची निवड होते. रेल्वेच्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात न देता इतर राज्यात दिल्या जातात, असे आरोप करत सन 2008 साली मनसेने आंदोलन केले होते. त्यावेळी राज्यभर मनसेने हे आंदोलन चांगलेच गाजले होते. या आंदोलनामुळे कल्याणमध्ये राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी या ठिकाणी मनसे बंद पुकारला होता. त्याला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे राज ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला होता.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)